जयपूर : दिवाळीनिमित्त काही अश्लील संदेश व्हाट्सअॅपवर पाठवल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील पोखरण येथे डॉ. महंमद याकूब या वैद्यकीय अधिकार्याला अटक करण्यात आली आहे. (अशा धर्मांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तो पोखरण येथे कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या पदावर होता. याकूबच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले होते.
अटकेनंतर याकूबला पदावरून हटवण्यात आले आहे. नेमका अश्लील संदेश काय आहे, हे वृत्तसंकेतस्थळांनी स्पष्ट केलेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात