Menu Close

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी !

nallasopara_police_nivedan

मुंबई : फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी अन् चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाकंडून मुंबई अन् नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. निवेदन देतांना हिंदू गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, मनसे यांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यामध्ये मुंबई जिल्हाधिकारी श्री. दीपेंद्रसिंग कुशवाहा यांना, तसेच वरळी, दादर, शिवाजी पार्क, माहीम, भायखळा, अंधेरी, जोगेश्‍वरी, नालासोपारा, विरार येथील पोलीस ठाण्यांत निवेदने देण्यात आली. मुलुंडचे तहसीदार डॉ. संदीप माने, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप आणि मुलुंड येथील पोलीस ठाण्यांमध्येही निवेदने देण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या आवाहनाला व्यापारी आणि फटाके विक्रेते यांचा सकारात्मक प्रतिसाद

बनखोडे परिसरातील ४० फटाके विक्रेत्यांना निवेदने !

mumbai_jiladhikari_nivedan

नवी मुंबई येथील बनखोडे परिसरातील ४० फटाके विक्रेत्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली. या वेळी सर्व दुकानदारांनी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले अन् चिनी फटाक्यांची विक्री करत नसल्याचे सांगितले, तर काहींनी अशा प्रकारे फटाक्यांची विक्री करणे योग्य नसल्याचे सांगून समिती करत असलेले कार्य योग्य असल्याचे म्हटले. समितीच्या वतीने सौ. तनुजा यादव, सौ. मंगल खोत, सौ. रेखा सावरकर यांनी ही निवेदने दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *