पुणे : इटालियन बनावटीची दोन पिस्तुले बाळगणाऱ्या नियाज अहमद फारुख मदारीला (वय २४) पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. खराडी भागात ही कारवाई करण्यात आली.
अहमद कडून दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली पिस्तुले परदेशी बनावटीची असल्याचे निष्पन झाले आहे. त्याने पिस्तूल कोठून आणली तसेच तो पिस्तुलांची कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मदारीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
संदर्भ : लोकसत्ता