पुणे येथील धर्मसभेतून प्रेरणा घेऊन शिरवळ (ता.खंडाळा) येथील धर्मप्रेमी कृतीप्रवण !
शिरवळ (जिल्हा सातारा) : हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्या फटाक्यांवर बंदी आणून विक्रेत्यांनाही असे फटाके विकण्यास मज्जाव करावा, अशा मागणीचे निवेदन शिरवळ येथील धर्माभिमान्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांना दिले, तसेच फटाके विक्रेत्यांचेही प्रबोधन केले.
नुकतीच पुणे येथे हिंदु धर्मजागृती सभा पार पडली होती. या सभेनंतर राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कृतीशील होऊ इच्छिणार्यांसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देवतांच्या फटाक्यांच्या विक्रीच्या विरोधात निवेदन देण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर लगेचच शिरवळ येथील धर्माभिमान्यांनी एकत्रित येऊन निवेदन दिले. धर्मजागृती सभेतून प्रेरित झालेल्या धर्माभिमान्यांनी धर्मरक्षणासाठी कृतीशील रहाण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी सर्वश्री सूरज राऊत, चिराल चव्हाण, रोहित राऊत, सागर जरांडे, आदेश खुटवड, अक्षय राऊत, विशाल राऊत, संग्राम राऊत, अक्षय असलेकर, केदार हाडके, अक्षय दळवी, अक्षय सणस यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (धर्मरक्षणासाठी कृतीशील झालेल्या शिरवळ येथील धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
शिरवळ पोलिसांकडून फटाके विक्रेत्यांना नोटीस !
देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत, याविषयीची नोटीस शिरवळ पोलिसांनी २१ फटाके विक्रेत्यांना यापूर्वीच दिली आहे. पोलिसांनी यासंदर्भातील प्रतही समितीच्या कार्यकर्त्यांना दाखवली. (अन्यत्रच्या पोलिसांनीही शिरवळ पोलिसांचा आदर्श घेऊन निवेदनांच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मभावनांची नोंद घेऊन देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात