-
ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्याची अभिनंदनीय कृती !
-
हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही
मुंबई : ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी परिसरातील व्यापारी आणि फटाके विक्रेते यांची बैठक घेऊन देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये, अशी सूचना सर्वांना दिली. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली. (अशा प्रकारे जनतेच्या भावनांची कदर केल्यानेच समाजामध्ये पोलिसांविषयी विश्वासार्हता निर्माण होईल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
)
याविषयी २० ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यात देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेेले फटाके फोडल्याने होणार्या चित्रांच्या चिंधड्या पायाखाली तुडवल्या जातात. यामुळे त्यांचा अवमान होतो. त्यामुळे देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करण्यात येऊ नये. अशा प्रकारे फटाक्यांची विक्री करणार्यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते. निवेदन दिल्यावर वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी व्यापार्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार दुसर्या दिवशी व्यापारी आणि फटाके विक्रेते यांची बैठक घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी याविषयी सूचना दिली. प्रशासनाकडूनही देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात