Menu Close

भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा

simi_jihadi

भोपाळ (मध्यप्रदेश) : भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या ‘सिमी’च्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भोपाळ मध्यवर्ती कारागृहापासून १० ते १२ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अचारपुरा गावात मध्य प्रदेश पोलिसांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केले.

अचारपुरा गावात पोलिसांनी कारागृहातून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, शरण येण्यास नकार दिल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

सिमीचे ८ दहशतवादी रात्री साडेतीनच्या सुमारास भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळाले होते. यावेळी त्यांनी जेलमधील सुरक्षारक्षकाचा गळा चिरुन त्याची हत्या केली आणि चादरीची रस्सी बनवून जेलची भिंत ओलांडली होती.

दहशतवादी फरार झाल्याने भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसह तिघांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर शहरभर हाय अलर्ट जारी करुन, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पळालेल्या दहशतवाद्यांचा तपास अत्यंत वेगाने सुरु करण्यात आला होता.

सिमी : स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया

सिमी (Students Islamic Movement of India) ही दहशतवादी संघटना आहे. २५एप्रिल १९७७ रोजी अलिगढमध्ये ‘सिमी’ची स्थापना झाली. २००१ साली सरकारने या संघटनेवर बंदी आणली. आतापर्यंत मध्यप्रदेशातून सिमीचे सर्वात जास्त दहशतवादी अटक करण्यात आले आहेत.

संदर्भ : एबीपी माझा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *