Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार !

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदु !

rape

ढाका : बांगलादेशच्या बगेर्‍हाट जिल्ह्यातील मोलार्‍हाट येथ महंमद सोभान नावाच्या धर्मांधाने एका ३५ वर्षीय हिंदु महिलेवर घरात घुसून बलात्कार केला. सदर महिलेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधाने तलवारीने त्याच्यावर वार केला. तेव्हा पतीच्या रक्षणार्थ पुढे आलेल्या पत्नीला तो वार लागला आणि तिचा उजवा पाय कापला गेला. त्या महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी चुकीच्या कलमाखाली तक्रार दाखल करून घेतली.

हिंदु कुटुंबावरील या अत्याचाराविषयीचे वृत्त कळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे कार्यकर्ते रविंद्रनाथ बराल आणि अमरेश गेन यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. पीडित महिलेला तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी, त्यांना आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य पुरवण्यात यावे. तसेच आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी बांगलादेश मायनॉरिटी वॉच ने केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *