हिंदूंनी अशा आस्थापनांवर बहिष्कार घालावा !
मेलबोर्न : रेड बबल या ऑस्ट्रेलियातील प्रतिदिन वापरातील साहित्याची ऑनलाईन विक्री करणार्या आस्थापनाने लेगिंन्सवर (मुलींची तंग विजार) ब्रह्मा, श्रीविष्णु, शिव, श्रीकृष्ण, गणेश, दुर्गादेवी, लक्ष्मीदेवी, स्कंध, सरस्वतीदेवी, हनुमान, काली, शेषनारायण इत्यादी देवतांची चित्रे छापून विडंबन केले आहे. त्यामुळे विदेशातील हिंदु धर्मियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी नेवाडा येथून एक पत्रक प्रसिद्ध करून रेडबबल आस्थापनाकडे लेगिंगवरून देवतांची चित्रे हटवण्याची मागणी केली आहे. रेडबबल आस्थापनाच्या संकेतस्थळाला १९२ देशांतील ४२ लक्ष ग्राहक भेट देतात.
हे छायाचित्र कोणच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी प्रसिद्ध केलेले नसून कशा प्रकारे देवतेचे विडंबन केले आहे हे वाचकांना समजावे, यासाठी हे प्रसिद्ध करत आहोत. – संपादक, हिंदुजागृती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात