-
१५० हून अधिक हिंदू घायाळ
-
२०० घरे आणि ८ दुकाने जाळली
जगभरात कोठेही इस्लामचा अनादर झाला की, लगेच कायदा हातात घेण्यात येतो, तरीही त्यांना कोणीही असहिष्णु म्हणत नाही कि त्यांना वैध मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला देत नाही; मात्र हिंदूंनी वैध मार्गानेही देवतांच्या विडंबनाचा विरोध केला, तरी त्यांना सनातनी म्हणून हिणवले जाते ! बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण मोठा भाऊ असणारा भारत कधी करणार ? बलुचिस्तानच्या नागरिकांची काळजी करणार्या सरकारने इस्लामी देशांतील हिंदूंचीही काळजी करावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : फेसबूकवर इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट सर्वत्र प्रसारित झाल्यावर धर्मांधांनी त्याचा राग हिंदूंवर काढला. ३० ऑक्टोबरच्या रात्री नसरीननगर येथील ब्राह्मणबाडिया विभागात शेकडो धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण करून येथील १५ मंदिरांची तोडफोड केली. तसेच २०० घरे आणि ८ दुकाने लुटून जाळण्यात आली. यात १५० हून अधिक हिंदू घायाळ झाल्याचे हिंदूंनी सांगितलेे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी ५०० जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या पोस्टप्रकरणी पोलिसांनी रसराज दास या २७ वर्षीय युवकाला अटक केली आहे. रसराज याने काबा येथील अल मशीद अल हराम या मशिदीमध्ये हिंदू देवतेचे चित्र दाखवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दास याने या प्रकरणी क्षमा मागितली असून कोणीतरी माझ्या फेसबूक पानावर हे चित्र पोस्ट केले, असा दावा त्याने केला आहे.
१. बांगलादेशमध्ये मुसलमानांसाठी पवित्रस्थळ असलेल्या मस्जिद-अल-हरमविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली फेसबुक पोस्ट प्रसारित झाली होती. यामुळे हिफाजत-ए-इस्लाम आणि अहले सुन्नत वल जमात या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन केले. फेसबुक पोस्ट अपलोड करणार्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. यानंतर हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.
२. धर्मांधांचे आक्रमण चालू असतांना पोलीस घटनास्थळी उशिरा पोचले, असे हिंदूंनी सांगितले आहे.
३. मंदिराची हानी केल्याप्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती स्थानिक नेत्यांनी दिली आहे.
४. परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती पहाता या परिसरात अर्धसैनिक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
५. या घटनेमुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे समाजसेवी संस्थांनी सांगितले.
६. या घटनेच्या आदल्या दिवशी बांगलादेशमधील मदरशातील विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. रसराजला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात