Menu Close

भारतीय कार्यक्रम दाखवला म्हणून पाकमध्ये चॅनेलचा परवाना रद्द

nick

इस्लामाबाद : पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटॉरी अथॉरिटी म्हणजेच पेमराने निकलोडियन चॅनेलचा परवाना रद्द केला आहे. भारतीय हिंदी भाषेत डब केलेले कार्टून दाखवल्याप्रकरणी निकलोडियन चॅनेलवर ही कारवाई करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पेमराकडून निकलोडियन चॅनेलवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानातही सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली होती. तसेच पेमराने सर्व चॅनेल्सना भारताशी संबंधित असलेला मजकूर प्रसारित न करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती.

संदर्भ : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *