Menu Close

मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा डाव; मात्र अनधिकृत मशीद आणि दर्गा यांवर कारवाई नाही !

  • नवी मुंबई महानगरपालिकेची मोगलाई !

  • एक लढा देवासाठी या धोरणाने ग्रामस्थ आणि भाविक यांचा मंदिरांच्या रक्षणासाठी लढा !

मंदिरांच्या रक्षणासाठी संघटित होणार्‍या ग्रामस्थांचे अभिनंदन !

Mandir_aaghat_Cनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने महानगरपालिका क्षेत्रातील २४ धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाईची नोटीस दिली आहे. महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या बांधकामामध्ये एक मशीद आणि एका दर्गा यांचा समावेश आहे. असे असतांना अतिक्रमण विभागाने केवळ मंदिरांवरच कारवाई चालू केली आहे. आतापर्यंत येथील ३-४ मंदिरे पाडण्यात आली आहेत. दुसरीकडे अनधिकृत मशीद आणि दर्गा यांविरोधात मात्र कारवाई करण्यात आलेली नाही.

याउलट ‘मशीद आणि दर्गा अधिकृत करता येतील’, असा शेरा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मंदिर पाडण्याविषयी खडसावणार्‍या भाविकांना मात्र येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ‘’आम्हाला कायदा शिकवू नका’’, असे उद्दामपणे उत्तर दिले. (हे पोलीस भारताचे कि पाकचे ? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी एकातरी मशिदीवर कारवाई केली आहे का ? कारवाईविषयी दुजाभाव करणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? ही स्थिती पालटण्यासाठी व्यापक हिंदुसंघटनाला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे आता ‘‘एक लढा देवासाठी’’ हे धोरण ठरवून सर्व ग्रामस्थ आणि भाविक मंदिरांच्या रक्षणासाठी सिद्ध झाले आहेत. ग्रामस्थांच्या या लढ्याला येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाठिंबा घोषित केला आहे.

दान दिलेल्या भूमीतीलच मंदिर अनधिकृत ठरवून पाडले !

कोपरखैरणे येथील श्री. अभिजीत म्हात्रे यांच्या जागेत असलेले एक हनुमानाचे मंदिर अग्नीशमनदलाच्या हद्दीत येत असून ते अनधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिकेकडून देण्यात आली. त्यावर श्री. अभिजीत म्हात्रे यांनी ‘हे मंदिर स्थानिक रहिवाशांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांना दर्शनासाठी येऊ द्या. मंदिर पाडू नका. त्याऐवजी मंदिराच्या बाजूची जागा देतो’, अशी महानगरपालिकेकडे विनंती केली. या विनंतीकडे दुर्लक्ष करून महानगरपालिकेने पहाटे ३ वाजता मंदिर पाडले. या वेळी मंदिराचे पुजारी आणि त्यांचे सहकारी यांना पोलिसांनी गाडीत डांबून ठेवले. रहिवाशांनी कुणाला संपर्क करू नये, यासाठी त्यांचे भ्रमणभाषही काढून घेण्यात आले. महानगरपालिका जी भूमी ‘अग्नीशमनदलाची आहे’, असा दावा करत आहे, ती मूलतः श्री. अभिजित म्हात्रे यांच्या आजोबांची वडिलोपार्जित भूमी आहे. या मंदिराची घरपट्टी श्री. म्हात्रे भरतात. त्यांनी ही भूमी कोणतेही मूल्य न घेता अग्नीशमनदलाला दान दिली होती. याविषयी कोणत्याही प्रकारे कागदोपत्री व्यवहार झाला नव्हता. याचा गैरलाभ घेऊन सिडकोने ही भूमी आम्हाला न विचारताच परस्पर अग्नीशमनदलाच्या नावे केली, असे श्री. अभिजित म्हात्रे यांनी सांगितले. (मंदिर दान देणार्‍याविषयी कृतज्ञ रहाणे दूरच, उलट दात्याच्या मंदिर न पाडण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणारे संबंधित शासकीय अधिकारी कृतघ्नच म्हणावे लागतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

जनतेच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

नवी मुंबई परिसरातील २८ गावांतील भूमी संपादित करण्यात येत असतांना त्या विरोधात येथील ग्रामस्थांनी आंदोलन उभारले होते. त्या वेळी प्रत्येक गावातील संपादित केलेल्या जमिनीच्या साडेबारा टक्के भूमी ग्रामस्थांना परतावा म्हणून परत करण्याचे धोरण ठरवण्यात आले. या साडेबारा टक्के जमिनीतील पावणेचार टक्के भूमी गावातील सेवासुविधांकरता उदा. मंदिर, दवाखाना, वाचनालय, व्यायामशाळा यांसाठी देण्याचे ठरवण्यात आले. अनधिकृत मंदिरे म्हणून नोटीस देण्यात आलेली मंदिरे सेवासुविधांकरता देण्यात येणार्‍या जमिनींमध्ये समाविष्ट करावीत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे; मात्र ग्रामस्थांच्या या मागणीकडे नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असे श्री. म्हात्रे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींची जनभावनांकडे पाठ !

ग्रामस्थांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीविषयी ग्रामस्थांकडून तीव्र अंसतोष व्यक्त करण्यात येत आहे; मात्र येथील एकाही लोकप्रतिनिधीने ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. याविषयी ग्रामस्थांकडून ‘केवळ मत मागण्यासाठी येणार्‍या लोकप्रतिनिधींनी जनभावनांकडे मात्र पाठ फिरवली आहे’, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदू संघटित झाल्याने वाशी येथील मंदिरावरील कारवाई थांबली !

कौपरखैरणे येथील हनुमानाचे मंदिर पडल्यानंतर २१ ऑक्टोबरला पहाटेच्या वेळी वाशी जुहूगाव येथील सेक्टर ११ मधील मारुतीचे मंदिर पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याविषयी ग्रामस्थांना कळताच भाविक, हिंदुत्वनिष्ठ आणि स्थानिक रहिवाशी असे शेकडो नागरिक पहाटेच्या वेळी मंदिराच्या ठिकाणी एकत्र आले. त्यांनी दर्शवलेल्या विरोधामुळे महानगरपालिकेला हे मंदिर पाडता आले नाही.

सिडकोला जमिनीचा मालकी हक्क देऊ करूनही मंदिर पाडले ! – अभिजीत म्हात्रे, भूमी मालक

ज्या वेळी आजूबाजूच्या मंदिरांना अनधिकृत म्हणून नोटीस देण्यात आल्या, त्या वेळी माझ्या जागेतील मंदिराविषयी नोटीस देण्यात आली नव्हती. दान दिलेल्या जमिनीवर त्या वेळी अग्नीशमनदलाच्या कार्यालयाचे बांधकाम चालू होते. बांधकाम पूर्ण झाल्यावरच मला मंदिर अनधिकृत असल्याची नोटीस देण्यात आली. या वेळी मी त्यांना ‘जमिनीचा मालकी हक्क देतो; मात्र मंदिर भाविकांना दर्शनासाठी असू दे’, अशी विनंती केली. याकडे दुर्लक्ष करून मंदिर पाडून टाकण्यात आले, अशी खंत श्री. अभिजीत म्हात्रे यांनी व्यक्त केली. (प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांचा कृतघ्नपणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ ! – मंगेश म्हात्रे, युवा प्रभारी, नवी मुंबई, हिंदू महासभा

मंदिरे वाचवण्यासाठी आम्ही २८ गावांतील सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी एकत्र येऊन ‘नवी मुंबई मंदिर समिती’ स्थापन केली आहे. या समितीद्वारे ‘‘एक लढा देवासाठी’’ असे धोरण ठरवून आम्ही मंदिर वाचवण्यासाठी एकत्र लढा देणार आहोत. या लढ्यात प्रकल्पग्रस्तही सहभागी झाले आहेत. आतापर्यंत परिसरातील ४ मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करून आम्ही याविषयी जागृती करत आहोत. या विरोधात संघटना, जात-पात, पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा देणार आहोत. (मंदिरांच्या रक्षणासाठी एकत्र येणार्‍या हिंदु बांधवांचे अभिनंदन ! धर्मरक्षणासाठी संघटित होणार्‍या धर्माभिमान्यांचा आदर्श समस्त हिंदूंनी घ्यावा. हिंदूंनो, संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच अशा प्रकारचे आघात रोखण्यासाठी एकमात्र उपाय आहे, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *