बंगळुरू : तंत्रज्ञान गुंतवणूकदार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टी. व्ही. मोहनदास पै यांनी कर्नाटक सरकारच्या ‘टिपू सुलतान’ जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
आैरंगजेबाच्या कार्यकाळाचा गौरव करण्याइतकाच हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचे मत मोहनदास पै यांनी व्यक्त केले. मुघल बादशहांनी जाणीवपूर्वक धार्मिक मूलतत्त्ववाद रुजवला, अशी भूमिका पै यांनी मांडली. केंद्र सरकारने आैरंगजेबाची जयंती साजरी करावी का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
१० नोव्हेंबर रोजी कर्नाटकात टिपू सुलतान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात ही पद्धत रूढ करण्यात आली होती. या निर्णयानंतर कर्नाटकात धार्मिक तणाव निर्माण झाला होता, तर कोडागु जिल्ह्यात हिंसक प्रकारही घडले होते. १८ व्या शतकात टिपू सुलतान याने म्हैसूर या आपल्या राजधानीतून कर्नाटकावर सत्ता गाजवली होती. टिपूजयंती साजरी करून सत्ताधारी पक्ष राजकारण करत आहे.
संदर्भ : दिव्य मराठी