- पाकिस्तान, बांगलादेश असो कि भारत, सर्वत्रच हिंदूंना कोणी वाली नसल्याने त्यांना त्यांच्याच देशातून पलायन करावे लागत आहे !
- अशी घटना धर्मांधांच्या संदर्भात झाली असती, तर एकजात सर्व निधर्मी त्यांच्या साहाय्यासाठी धावून गेले असते ! हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : येथून १०० कि.मी. अंतरावर असणार्या ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नासिरनगर येथे ३१ ऑक्टोबरला ३ सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून १५ मंदिरांची तोडफोड केली होती, तर २०० घरांना आग लावण्यात आली. यात दीडशेहून अधिक हिंदू घायाळ झाले होते. या घटनेमुळे घाबरलेल्या ६ हिंदु परिवारांनी देश सोडून पलायन केले आहे. तसेच काही परिवारांनी गाव सोडून अन्यत्र स्थलांतर केले आहे. ते परत गावात येण्यास घाबरत आहेत. ढाका ट्रिब्यून या दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (ढाका ट्रिब्यूनने ज्या प्रमाणात हिंदूंवरील आक्रमणाच्या संदर्भात घटनास्थळी माहिती घेऊन वृत्त प्रसिद्ध केले आहे, तसे भारतात हिंदूंवर होणार्या आक्रमणाच्या संदर्भात एकतरी प्रसारमाध्यम वृत्त प्रसिद्ध करते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. या वृत्तात पुढे म्हटले आहे की, वर्ष १९७१ च्या मुक्तीसंग्रामाच्या वेळी झालेल्या सामूहिक नरसंहारानंतरही देश न सोडणार्या हिंदूंना आता प्राण वाचवण्यासाठी देश सोडून जावेच लागणार आहे.
२. फेसबूकवरून काबा मशिदीविषयी कथित आक्षेपार्ह चित्र पोस्ट केल्यावर हे आक्रमण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी रसराज दास या हिंदु तरुणाला अटक केली आहे. रसराज याने आधीच मुसलमानांची या संदर्भात क्षमा मागितली होती आणि म्हटले होते की, त्याचे फेसबूक खाते कोणीतरी हॅक केले आहे.
३. त्याविषयी स्थानिक मुसलमान बुलू मियां म्हणाले की, तो एक चांगला मुलगा आहे. मला वाटते त्याला काबा मशिदीविषयी काहीच माहिती नसणार. तो एक अशिक्षित मुलगा आहे, तर तो फेसबूकवर अशी पोस्ट कशी करू शकतो ?
४. हिंदूंवरील आक्रमणांत त्याची घरे लुटण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १ सहस्र धर्मांधांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
५. नुकताच सत्ताधारी अवामी लीगच्या ४ सदस्यांच्या पथकाने घटनास्थळाचा दौरा केला. त्यांनी हिंदूंना आश्वासन दिले की, आक्रमणाची सर्व माहिती पंतप्रधान शेख हसीना यांना देण्यात येईल.
६. नासिरनगरमध्ये सुमारे ३३ टक्के मतदार हिंदु आहेत आणि त्यांनी सातत्याने सत्ताधारी अवामी लीग पक्षाला समर्थन दिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात