Menu Close

हिंदूंच्या धार्मिक स्थळाला सहलीचे ठिकाण बनवू नका ! – श्री. मुरलीधरन्, भाजप

शबरीमला मंदिरात गेलेल्या केरळच्या मुसलमान मंत्र्याला भाजप नेत्याने फटकारले !

sabarimala-620x400-1

थिवरुनंपुरम् : केरळ येथील भाजपचे वरिष्ठ नेते व्ही. मुरलीधरन् यांनी राज्याचे मुसलमान मंत्री के.टी. जलील यांना शबरीमला मंदिरात गेल्यामुळे विरोध केला. जलील ३० ऑक्टोबरला शबरीमला मंदिरात गेले होते. तेथे जाणारे ते पहिले मुसलमान मंत्री आहेत.

श्री. मुरलीधरन् म्हणाले, हिंदूंच्या धार्मिक स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये. जलील हे पूर्वी सिमी या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. ते एकदम निधर्मी बनले असतील यांवर माझा विश्‍वास नाही. माझ्या माहितीनुसार जलील यांचे मंदिरात कोणतेही काम नव्हते. छायाचित्र काढण्यासाठी मंदिराला सहलीचे ठिकाण बनवणे योग्य नाही. जलील यांना भगवान अयप्पा यांचे भक्त बनून मंदिरात जायचे असल्यास त्यांनी जावे; मात्र राजकारण करू नये.

जलील राज्याचे अल्पसंख्यांक कल्याण आणि हज यात्रा या खात्याचे मंत्री आहेत. ते अन्य एक मंत्री कडकांपल्ली सुरंद्रन् यांच्या समवेत शबरीमला मंदिरात होणार असलेल्या एका उत्सवाच्या सिद्धतेची पाहणी करण्यास गेले होते. जलील यांनी मंदिरासमवेतचे स्वतःचे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर अपलोड केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *