- पीतपत्रकारांना खिरापतीसारखे पुरस्कार वाटणार्यांच्या पुरस्कारांचा दर्जा किती खालचा असतो हे यावरून लक्षात येते !
- सनातनच्या विरोधात कथित शोध पत्रकारिता करा आणि पुरस्कार घ्या अशी योजनाच चालू झाली आहे, असेच यातून लक्षात येते ! अशी पत्रकारिता समाजाला दिशा काय देणार ?
- आतापर्यंत प्रसारमाध्यमे सनातनच्या विरोधात खोट्या बातम्या प्रसिद्ध करून सनातनची अपकीर्ती करत होती आणि आता अशी अपकीर्ती करणार्यांना पुरस्कार देण्याचा नवा पायंडाही त्यांनी याद्वारे घातला आहे !
नवी देहली : पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करणार्यांना इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रतिवर्षी पुरस्कार देण्यात येतो. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार गणेश ठाकूर यांना यावर्षी रामनाथ गोएंका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहलीत झालेल्या एका सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ऑपरेशन संमोहन या विषयावरील तथाकथित शोध पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या विषयांतर्गत गणेश ठाकूर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या उत्तरप्रदेशातील दोन साधिकांविषयीचे दिशाभूल करणारे वृत्त बनवले होते. सनातनने या साधिकांना संमोहित केल्याचा आरोप या साधिकांच्या परिवाराने केला होता. याविषयीचे वृत्त एबीपी माझा आणि एबीपी न्यूज या वाहिन्यांनी प्रसारित केले होते.
या वृत्तानंतर या साधिकांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सत्यस्थिती सांगितली होती. या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण अनेक वृत्तवाहिन्यांनी केले होते. या युवतींनी दिलेल्या सर्व उत्तरानंतर सत्य उघड झाल्यावर सर्व वृत्तवाहिन्यांचे पितळ उघडे पडले होते आणि गणेश ठाकूर यांच्यासह सर्व उपस्थित पत्रकारांची बोलतीच बंद झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी याविषयी कोणतेही वृत्त प्रसारित केलेले नाही. (यावरून गणेश ठाकूर यांना दिलेल्या पुरस्काराचा दर्जा लक्षात येतो. या पुरस्कारासाठी गणेश ठाकूर यांची निवड करणारे तज्ञ एकतर या प्रकरणी अज्ञानी असतील किंवा त्यांना जाणीवपूर्वक सनातनच्या विरोधातील वृत्त देणार्याला पुरस्कार देण्यासाठी बाध्य करण्यात आले असेल, अशी शंका येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात