पॅरिस : फ्रान्स सरकारने पॅरिसमधील ४ मशिदी बंद करण्याचा आदेश दिला आहे. या मशिदींमधून जिहादी विचारसरणीचे समर्थन करण्यात येत होते, असे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जिहादी आक्रमणानंतर येथे जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. (भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद असतांना आणि मशिदी अन् मदरसे यांतून जिहाद्यांना समर्थन, साहाय्य मिळत असतांना भारताने कधी त्यांच्यावर बंदी घातली नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात