Menu Close

अलीगड : हिंदूंवरील धर्मांधांच्या आक्रमणानंतर हिंदु महासभेकडून हिंदूंना स्वसंरक्षणार्थ परवानाधारक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन !

dharmandh2

अलीगड : काही दिवसांपूर्वी येथील बाबरी मंडी भागात धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याची घटना घडली होती. यात २ ठार, तर एक जण घायाळ झाला होता. या प्रकरणी हिंदु महासभेने हिंदूंना स्वसंरक्षणार्थ सिद्ध रहाण्याचे आवाहन केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हिंदु महासभेने यासाठी हिंदूंना तलवार, त्रिशूळ ही परवानाधारक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी हिंदु महासभा साहाय्य करील, असेही म्हटले आहे.

या आवाहनावर मुसलमान संघटनांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ते येथे तणाव निर्माण करत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. उलट येथील हिंदूंना घाबरवले जात आहे, असे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *