Menu Close

श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट

देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणेही कायद्याच्या दृष्टीने अदखलपात्रच !

shripal_sabnis
श्रीपाल सबनीस

मुंबई : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सबनीस यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मोदी यांनी तडकाफडकी केलेल्या पाक दौर्‍याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. पाकमध्ये मोदी यांच्यावर आक्रमण होऊन त्यात जर मोदी यांचा मृत्यू झाला असता, तर पाडगावर यांच्यापूर्वी मोदी यांचीच शोकसभा घ्यावी लागली असती, अशा आशयाची विधाने त्यांनी करत मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर थोरात यांनी तक्रार प्रविष्ट केली.

सबनीसांच्या विरोधात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढू ! – भाजपचे खासदार साबळे

सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात जी अवमानकारक विधाने केली आहेत, ती अत्यंत निषेधार्ह आहेत. आम्ही सबनीस यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करणार असून त्यांत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढणे, त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणे अशा विविध आंदोलनांचा समावेश असेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *