Menu Close

अमरावती येथे लव्ह जिहाद : धर्मांधाने प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर सोडून दिले

३ मासांनंतर बळजोरीने गर्भपात

Love_jihad_M
अमरावती : येथील धर्मांध साहिल शाह याने अन्य धर्मीय प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर तिला सोडून दिले. पीडितेच्या तक्रारीनंतर साहिलविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.

धर्मांध साहिल आणि त्याची प्रेयसी लग्न न करताच एकत्र रहात होते. ते दोघे एकाच आस्थापनात नोकरी करत होते. ती ३ मासांची गर्भवती असतांना साहिलने तिचा गर्भपात केला. त्याने लग्नासाठी टाळाटाळ करत होता. ६ मासांनी त्याने तिला सोडून दिले. प्रेयसी त्याच्या कुटुंबियांकडे त्याची चौकशी केली; मात्र त्यांनी तिला टाळले. याप्रकरणी प्रथम येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांनीही साहिलविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याचे टाळले. तिने पोलीस आयुक्तांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी गुन्हा प्रविष्ट करण्याचे आदेश दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *