बंगालमधील हिंदूंवर प्रतिदिन धर्मांधांकडून आक्रमण होत असतांना हिंदूंच्या संरक्षणासाठी कोणतेही प्रयत्न न करणार्या ममता(बानो) यांचे हे विधान म्हणजे धूळफेकच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जम्बोनी (बंगाल) – बंगालमध्ये आम्ही लोकांबरोबर भेदभाव केला नाही. बंगालमध्ये धार्मिक हिंसाचाराला थारा नाही. ते सहनही केले जाणार नाहीत. केवळ बंगालमध्येच दुर्गापूजा आणि मोहरम एकत्र साजरे केले जाऊ शकतात, असे प्रतिपादन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केले. (खोटे बोलणार्या ममता बॅनर्जी ! मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षी आणि यावर्षीही हिंदूंना नवरात्रीच्या वेळी दुर्गामूर्ती विसर्जनाला दुसर्या दिवशी मोहरम असल्याने प्रतिबंध केला होता. त्यांना मोहरमच्या वेळी मूर्ती विसर्जन करण्यावर बंदी घातली होती. – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) येथे आयोजित एका सभेत त्या बोलत होत्या. देशामध्ये धार्मिक आणि राजनैतिक असहिष्णुतेचे वातावरण आहे, अशी भाजपवर टीकाही त्यांनी केली. (प्रत्यक्षात बंगालमध्येच धार्मिक आणि राजनैतिक असहिष्णुता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात