कर्नाटकातील टिपूचे वंशज असणार्या काँग्रेस सरकारची दडपशाही !
पुत्तूर (कर्नाटक) : १० नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार्या टिपू सुलतान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुत्तूरचे तहसीलदार अनंत शंकर यांनी ३१ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांकडून १० लक्ष रुपयांचा बाँड भरून घेण्याचा आदेश दिला आहे. गेल्या वर्षी टिपू जयंती उत्सवाच्या वेळी दंगल उसळल्याने सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली होती. या वेळी त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तहसीलदाराने हा आदेश काढला आहे.
टिपू जयंतीला विरोध करणार्या नेत्यांची नावे तहसीलदारांनी मागवून घेतली आहेत. बाँड भरण्यास नकार देणार्या हिंदु नेत्यांना टिपू सुलतान जयंती साजरी होईपर्यंत कारागृहात पाठवले जाईल, असे तहसीलदारांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तहसीलदार अनंत शंकर यांनी पत्रकारांशी बोलतांना खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश देण्यात आला आहे. तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बाँड भरण्याविषयीच्या राज्य सरकारच्या आदेशाचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध केला आहे. हा आदेश मागे घेण्याची मागणीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
टिपू सुलतान जयंती विरोधी तालुक समितीचे प्रवक्ते शिवरंजन म्हणाले की, राज्य सरकारचा आदेश हिंदुविरोधी आहे. सरकारच्या कार्यक्रमात बाँडची मागणी करणे हे अर्थहीन आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात