अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंची लैंगिक शोषणाच्या संदर्भातील वृत्त दडपणारी भारतातील प्रसारमाध्यमे हिंदूंच्या संतांविषयी खोटी वृत्ते प्रसारित करून त्यांची अपकीर्ती करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : सप्टेंबर महिन्यात संतश्री आसाराम बापू यांना येथील एम्स् रुग्णालयात चिकित्सेसाठी भरती करण्यात आले होते. त्या वेळी एका दैनिकाने वृत्त प्रसिद्ध करतांना पू. बापू यांनी स्थानिक परिचारिकेशी बोलतांना आक्षेपार्ह विधान केल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात रुग्णालयातील प्रसारमाध्यम आणि शिष्टाचार विभागाच्या अध्यक्षा प्रा. नीरज भाटला आणि प्रवक्ता डॉ. अमित गुप्ता यांनी १७ ऑक्टोबरला लिखित स्वरूपात दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची कोणतीही घटना किंवा विधान रुग्णालयातील परिचारिका अथवा कर्मचार्याच्या संदर्भात घडलेले नाही, असे म्हटले आहे. तसेच पोलिसांकडेही या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. यामुळे संबंधित दैनिकाची पीतपत्रकारिता दिसून आली आहे. (प्रसारमाध्यमांकडून हिंदु संतांची कशी अपकीर्ती केली जाते हे या घटनेतून लक्षात येते ! अशा प्रसारमाध्यमांवर हिंदूंनी बहिष्कार घातला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात