धर्माभिमान्यांचा धर्मकार्यातील सहभाग
१. दसर्यानिमित्त ठाणे जिल्ह्यात सामूहिक सोने वाटपाचे नियोजन !
डोंबिवली, अंबरनाथ आणि ठाणे येथे चौकांमध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. येणार्या जाणार्या लोकांना दसर्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. त्या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या दसरा विशेषांकाचे वाटपही करण्यात आले. या वेळी ठाणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अरुणा गायकवाड यांनी उपस्थित महिलांना दसर्याचे शास्त्र सांगितले.
२. अंबरनाथ येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त महिलांना स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर !
महिलांमध्ये स्वसंरक्षणाविषयीची जागृती व्हावी, या उद्देशाने अंबरनाथ येथील गावदेवी मंदिर मंडळात कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने समितीच्या वतीने पथनाट्य दाखवण्यात आले. त्याचसमवेत फॅक्टनिर्मित आतंकवादाचे भीषण सत्य हे छायाचित्र प्रदर्शनही लावण्यात आले होते. समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. सुनिता पाटील यांनी महिलांवरील अत्याचार, लव्ह जिहाद यांविषयी माहिती दिली. एक भारत अभियान – कश्मीर की ओर या संदर्भातही या वेळी विषय घेण्यात आला. हे छायाचित्र प्रदर्शन पाहून मंडळाचे श्री. अनिल भोईर म्हणाले, मी प्रतिवर्षी काश्मीरला जात असतो. या प्रदर्शनात जे दाखवले आहे, तशीच परिस्थिती काश्मीरमध्ये अद्यापही आहे. याविषयी खूप जागृती होणे आवश्यक आहे.
३. सांगुर्ली, रायगड येथील कृषी महाविद्यालयात फॅक्टनिर्मित आतंकवादाचे भीषण सत्य या विषयावरील छायाचित्र प्रदर्शन !
सांगुर्ली, जिल्हा रायगड येथील कृषी महाविद्यालयात फॅक्टनिर्मित आतंकवादाचे भीषण सत्य हे छायाचित्रात्मक प्रदर्शन लावण्यात आले. या वेळी एक भारत अभियान – कश्मीर की ओर या अभियानाची माहितीही देण्यात आली. याचा लाभ तेथील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी घेतला.
– श्री. विश्वनाथ कुलकर्णी, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मुंबई, ठाणे आणि रायगड.