बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचे प्रकरण
भारतातील मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष बांगलादेशातील पीडित हिंदूंसाठी काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर होणार्या आक्रमणांमागे सुनियोजित षड्यंत्र आहे. या आक्रमणांद्वारे हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा निष्कर्ष बांगलादेशातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने काढला आहे. (बांगलादेशातील मानवाधिकार आयोग हिंदूंवरील आक्रमणाची नोंद घेतो; मात्र भारतातील मानवाधिकार आयोगाला हिंदू मानव आहेत, याचा विसर पडला आहे; त्यामुळे भारतात हिंदूंवर काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसामपर्यंत होत असलेली आक्रमणे त्याला दिसत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ब्राह्मणबाडीया जिल्ह्यातील नसीरनगरमधील हिंदूंच्या मंदिरावरील आक्रमणाविषयी चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यातील प्रमुख सदस्य एनामुल हक चौधरी यांनी येथील दैनिक द डेली स्टारच्या प्रतिनिधीला माहिती देतांना सांगितले, आमच्या प्राथमिक चौकशीत हे आक्रमण सुनियोजित होते. येथील हिंदूंना पळवून लावून त्यांच्या भूमीवर अतिक्रमण करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आल्याचे समोर येत आहे. पुढील २ दिवसांत आमची चौकशी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ घटनास्थळी जाऊन हिंदूंची भेट घेणार आहे. सत्ताधारी अवामी लीगच्या शिष्टमंडळाने यापूर्वी येथील दौरा करून हिंदूंची स्थिती समजून घेतली आहे.
आक्रमणात पळवलेली श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती मशिदीत सापडली !
बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात भारत सरकार ठोस आणि परिणामकारक पाऊल कधी उचलणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशच्या ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नासीरनगरमध्ये हिंदूंची मंदिेरे आणि घरे यांवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाला ७ दिवस झाले असतांनाच पोलिसांनी याच भागातील एका मशिदीतून श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती हस्तगत केली आहे. याविषयी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका गटाने मशिदीत जाऊन देवीची मूर्ती हस्तगत केली, असे नासीरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अबू जाफर यांनी द डेली स्टार या दैनिकाच्या प्रतिनिधीला सांगितले. मशिदीमध्ये सापडलेली मूर्ती ही ३० ऑक्टोबरला ५ मंदिरांवर झालेल्या आक्रमणाच्या वेळी चोरीला गेलेल्या मूर्तींपैकी एक मूर्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
३० ऑक्टोबरला नासीरनगर येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदूंची ५ मंदिरे आणि १०० घरे यांची नासधूस करण्यात आली होती. या आक्रमणात हिंदूंच्या अनेक मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या होत्या. तसेच या आक्रमणामध्ये १०० पेक्षा अधिक हिंदू घायाळ झाले होते. येथील रसराज दास नावाच्या हिंदु युवकाने फेसबूकवरील एका पोस्टद्वारे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप करून हे आक्रमण करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी येथील धर्मांधांनी पुन्हा आक्रमण करत हिंदूंची ५ घरे पेटवली. नासीरनगर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात