केरळच्या साम्यवादी सरकारने काँग्रेस सरकारचे मत पालटले !
नास्तिकतावादी साम्यवाद्यांना हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार ? साम्यवादीवाले मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करण्याला विरोध करतात आणि दुसरीकडे स्वतः हिंदूंच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करतात, हे त्यांचे ढोंगी पुरोगामित्व आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : केरळच्या शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्र्षे वयोगटातील महिलांना धार्मिक कारणामुळे प्रवेश करण्यास गेल्या दीड सहस्र वर्षांपासून बंदी आहे. ही बंदी उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर पूर्वीच्या काँग्रेस सरकारने बंदी कायम ठेवण्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात म्हटले होते; मात्र केरळच्या साम्यवादी पक्षाच्या नव्या सरकारने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करत सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश मिळावा, असे मत न्यायालयात मांडले आहे. यावर शबरीमाला मंदिर बोर्डाने सरकारवर टीका करत अशा प्रकारे ते त्यांचे मत पालटू शकत नाहीत, असे म्हटले आहे. यावर १३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २००६ पासून हे प्रकरण न्यायालयात चालू आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात