भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध न करून देणारे निष्क्रीय प्रशासन !
त्र्यंबकेश्वर : येथे भाविक पर्यटकांना वाहनतळ, तसेच अन्य गोष्टींतही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या होणार्या गैरसोयीविषयी नगरपालिका उदासीन आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यात लक्ष देण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
१. येथील वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा नसते. तेथे कुणी सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. त्यामुळे वाहनधारक एकमेकांशी वाद घालतात. लक्षावधी रुपयांचे वाहन भाविकांना तसेच सोडून आत जावे लागते.
२. स्वच्छतागृह, स्नानगृह यांचीही व्यवस्था अपुरी आहे. तरीही त्यासाठी पैसे आकारले जातात.
३. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभारलेल्या जलकुंभाच्या ठिकाणी तेथील झोपड्यांत रहाणारे लोक आंघोळी करतात. त्यामुळे पिण्यासाठी पाणीही मिळत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात