किंशासा : कांगो रिपब्लिक येथे झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे ३२ शांती सैनिक जखमी झाले आहेत. स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. यूएन मिशनच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
यूएन मिशनने म्हटले आहे, की कांगो येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. भारताचे शांती सैन्य गोमा जिल्ह्यातील एका गावात सर्च ऑपरेशनसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या गाडीला टार्गेट करण्यात आले.
संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनमध्ये भारत १७ वर्षांपासून सहभागी आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३२६३ सैनिकांना वीरमरण आले आहे. यात १५७ भारतीय आहेत. यानंतर नायझेरियाचा क्रमांक लागतो. त्यांचे १४२ सैनिक शहीद झाले आहेत.
संदर्भ : दिव्य मराठी