नगर : शनिशिंगणापूर येथील चौथर्यावर चढण्याची धर्मविरोधी कृती प्रसिद्धीची हौस भागवणार्या धर्मविरोधक मंडळींकडून येत्या २६ जानेवारीला चौथर्यावर चढण्याची धर्मशास्त्रविरोधी मोहीम राबवली जाणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा मोडून हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे भंजन करण्याच्या पुरोगाम्यांच्या या प्रकाराच्या विरोधात स्थानिक नागरिक, तसेच श्रद्धावान हिंदू, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्या मनात रोष आहे; म्हणूनच धर्मविरोधकांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, तसेच धार्मिक प्रथा, परंपरा यांच्या रक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार ६ जानेवारीला खाकीदास महाराज मठात झालेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.
२६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शनिमंदिराच्या चौथर्यावर चढण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाविक आणि भक्त मंदिराला सुरक्षाकडे करणार आहेत. या अभियानात अधिकाधिक हिंदू भाविक सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करण्याचे या वेळी उत्स्फूर्तपणे ठरवण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीला उपस्थित संघटना
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, वारकरी संप्रदाय, हिंदु राष्ट्र सेना, पुरोहित संघ, साईसेवा संघ, बजरंग दल, शिवसेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी, मढी देवस्थान विश्वस्त
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात