Menu Close

डोनाल्ड ट्रंप बनले अमेरिकेचे ४५ वें राष्ट्रपती, हिलरींना धक्का !

trump

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून, वेगवेगळ्या भाकीतांना धक्का देत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’वरील आपला दावा आज पक्का केला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना निवडणुकीच्या रिंगणात उतरून विजय प्राप्त करून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात इतिहास घडवला. जगातील सर्वाधिक बलाढ्य राष्ट्र आणि सर्वात जुनी लोकशाही म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे बघितले जाते.

भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावरच डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आघाडी घेतली. जी राज्ये रिपब्लिकन पक्षाची पाठिराखी म्हणून परिचित आहेत. त्या राज्यांमध्ये त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. पण त्याचबरोबर कोणत्याही एका पक्षाशी एकनिष्ठ नसलेली आणि ऐनवेळी कोणाला मत देतील, याबद्दल संदिग्धता असलेल्या राज्यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांनाच आपले मत टाकले. त्यामुळे निवडणुकीच्या विजयासाठी महत्त्वाची असलेली फ्लोरिडा आणि ओहायो या दोन्ही स्विंग स्टेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचाच विजय झाला. या दोन्ही राज्यांकडून हिलरी क्लिंटन यांना खूप अपेक्षा होत्या. पण तेथील सर्वाधिक मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच विश्वास दाखवला.

निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार हे जसजसे स्पष्ट होऊ लागले तसतसा त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांवरही झाला. आशियाई शेअर बाजारांचे निर्देशांक बाजार उघडताच कोसळले. डॉलरचे भावही आंतरराष्ट्रीय बाजारात घसरले. यावरूनही त्यांच्या विजयामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला असल्याचे दिसून येते आहे.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *