Menu Close

दैनिक सनातन प्रभातच्या पुणे येथील कार्यालयाला एका धर्मांधाकडून धमकीपत्र : पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

प्रखर हिंदुत्वनिष्ठ दैनिक सनातन प्रभातला असे धमकीपत्र येणे, हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

ईश्‍वर आणि संत यांच्या आशीर्वादाच्या बळावर चालू असलेले सनातन प्रभातचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य अशा धमक्यांनी कधीही थांबणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत हे कार्य अव्याहतपणे चालूच रहाणार आहे, हे धर्मांधांनी लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

dainik_snatan_prabhat

पुणे : दैनिक सनातन प्रभातच्या पुणे कार्यालयामध्ये एका धर्मांधाने धमकीपत्र पाठवले आहे. हे पत्र एस्एम् पगडीवाले (रहाणार सोलापूर) याने पाठवले असून ते येथील दैनिकाच्या कार्यालयामध्ये ४ नोव्हेंबर या दिवशी प्राप्त झाले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी सनातन प्रभातमार्फत तक्रारअर्ज प्रविष्ट करण्यात आला आहे. ‘पोलिसांनी या प्रकरणी त्वरीत लक्ष घालून धमकी देणार्‍या धर्मांधावर कारवाई करावी’, अशी मागणी या अर्जातून करण्यात आली आहे. हे धमकीपत्र इंग्रजी, उर्दू आणि हिंदी भाषेत लिहिले आहे.

sanatan_prabhat_dhamki_patra
धर्मांधांनी पाठवलेले पत्र

त्यात म्हटले आहे की,

१. जे अल्लाहला मानत नाहीत, ते यहूदी, बौद्ध, हिंदू कोणीही असोत, ते आमच्यासाठी काफीरच आहेत. आमचा शत्रू हिंदुस्थान असून नागपूरवाले आणि पुण्यातील ब्राह्मणांनो, तुमचे स्थान ‘वैकुंठ वा कैलास’ घाट आहे.

२. आम्ही तुमची झोप उडवून देऊ. पठाणकोट आणि उरी येथे झालेले आक्रमण हा एक ‘ट्रेलर’ असून आणखी खूप काही बाकी आहे. आम्ही तुमच्याच देशातील घरभेद्यांना घेऊन तुमच्या देशाला आग लावू. तो दिवस आता जवळ आला आहे. एक दिवस आम्ही काश्मीरमध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकवणारच.

३. जो कोणी काफीर (हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती) आहे, मग तो सनातनी ब्राह्मण, मराठा, महार कोणीही असो, तुमची जागा स्मशानभूमीत आहे. प्रमोद मुतालिक या पिसाळलेल्या कुत्र्याला सांगा की, काश्मीर तुमच्या बापाची अनामत नाही. मुतालिक ओरडून सांगतात की, ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणार.’ ते आता विसरून जा.

४. मोदी मुर्दाबाद ! शरीफ झिंदाबाद ! झिनपिंग झिंदाबाद !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *