धर्मरक्षणासाठी संघटित होणार्या अकोला येथील अधिवक्त्यांचा आदर्श सर्वत्रच्या अधिवक्त्यांनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
अकोला : धर्मासाठी अव्याहतपणे कार्यरत असणार्या प्रामाणिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सदैव पाठीशी उभे राहू, असा दृढ निर्धार येथील अधिवक्त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ नोव्हेंबर या दिवशी अभिरूची गार्डन, अकोला येथे आयोजित अधिवक्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
हिंदु जनजागृती समितीच्या अकोला येथील प्रांतीय अधिवेशनातून प्रेरणा घेऊन या अधिवक्त्यांनी प्रत्येकी १५ दिवसांतून एकदा एकत्रित येण्याचे ठरवले होते. त्यानुसार या पहिल्या बैठकीला अधिवक्ते उपस्थित होते.
या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वय श्री. श्रीकांत पिसोळकर आणि अकोला जिल्हा समन्वयक कु. निधी बैस हे उपस्थित होते.
अधिवक्त्यांनी हिंदूंना आधार देऊन कायदेविषयक साहाय्य करणे आवश्यक ! – अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी
बैठकीत संभाजीनगर (औरंगाबाद) येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी यांनी अधिवक्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, सध्या हिंदु धर्माची स्थिती पराकोटीची बिकट झाली आहे. हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हा होय. यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन हिंदूंना आधार देणे, कायदेविषयक साहाय्य करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन हिंदूंच्या पाठीशी उभे रहायला हवे.
बैठकीला उपस्थित अधिवक्ते
सर्व अधिवक्ते अनिकेत राठोड, सौ. वैशाली गावंडे, मधुसुदन शर्मा, पप्पूभाऊ मोरवाल, परेश सोळंकी, जयेश कोठारी, कु. सविता राजनकर, सौ. श्रुती भट
बैठकीत पारित केलेले ठराव
१. प्रत्येकी १५ दिवसांनी एकत्र येणे आणि बैठकीला अन्य अधिवक्त्यांचा सहभाग वाढवणे
२. बैठकीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांना आणणे
३. दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे
४. दंगलीच्या वेळी अथवा अन्य वेळी पीडित हिंदूंना विनामूल्य कायदेशीर आणि आर्थिक साहाय्य करणे
५. अकोला जिल्ह्यातील नियोजित हिंदु धर्मजागृती सभेत सक्रीय सहभाग घेणे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात