इंदूर (मध्यप्रदेश) : नवी देहलीत ७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी गोरक्षा आंदोलनाच्या वेळी इंदिरा गांधी सरकारने आंदोलनात उपस्थित गायी, संत आणि हिंदू यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. भारताच्या इतिहासाला कलंकित करणार्या या घटनेला काल ५० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ इंदूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलनांचे आयोजन करण्यात आले.
‘गोभक्त बलीदान स्मरण समिती’च्या वतीने मूक मोर्च्याचे आयोजन !
‘गोभक्त बलीदान स्मरण समिती’च्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ इंदूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. याला १ सहस्राहून अधिक हिंदू उपस्थित होते. येथील पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याजवळ गोभक्तांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्च्याची सांगता करण्यात आली. या वेळी मुसलमान, ख्रिस्ती पंथांचेही प्रमुख उपस्थित होते.
इंदूर येथे अ.भा. हिंदु महासभेच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी महासभेचे प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्रसिंह ठाकूर यांच्यासह सर्वश्री नीलेश दुबे, देवसिंह आर्य, पवनकुमार त्रिपाठी, सावन सोनी, विनोद मिश्रा, संजय चौहान, महेश राठौर, मोहित वर्मा, शिवम् माली, योगेश लोढी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात