Menu Close

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारकडून टिपू सुलतान (सैतान) याची जयंती साजरी !

हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप यांच्याकडून टिपू सुलतान (सैतान) जयंतीला विरोध !

tipu_sultan

बेंगळुरू : कर्नाटकातील टिपू सुलतान(सैतान) याची वंशज असल्याप्रमाणे त्याची १० नोव्हेंबरला जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून, तसेच भाजपकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले.

१. येथील टाऊन हॉलमध्ये सरकारने जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अन्य मंत्री सहभागी झाले होते. याविरोधात भाजपचे कार्यकर्ते टाऊन हॉलच्या बाहेर जमा झाले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले आणि मोर्चाही काढला. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा सहभागी झाले होते. या वेळी पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले.

२. येडियुरप्पा म्हणाले की, आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही; मात्र आमचा टिपू जयंतीला विरोध आहे. (असे बोलून येडियुरप्पा दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजायला जनता दूधखुळी नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. राज्यातील मडिकेरी येथे निदर्शने करणार्‍या ७० हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे कोडगू जिल्हा अध्यक्ष मनू मुथप्पा यांचा समावेश होता. तसेच आमदार के.जी. भोपय्या, अप्पाचू राजन आणि सुनील सुब्रह्मणी यांनाही अटक करण्यात आली. गेल्या वर्षी जयंतीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.

४. कोडगू जिल्ह्यात हिंदु जागरण वेदिके आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बंद पुकारला होता.

५. जयंतीच्या कार्यक्रमामुळे राज्यभरात पोलिसांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले होते, तर बेंगळुरूसारख्या काही शहरांमध्ये मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून आधीच राज्यभरातून २ सहस्र लोकांना अटक करण्यात आली होती; मात्र तरीही कोडगू येथे ९ नोव्हेंबरला टिपू सुलतान(सैतान) जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात २ जण ठार झाल्याची घटना घडली.

टिपू सुलतानच्या जयंतीच्या वेळी काँग्रेसचे शिक्षणमंत्री पहात होते अश्‍लील (पॉर्न) चित्रपट !

हिंदु महिलांवर अत्याचार करणार्‍या वासनांध टिपू सुलतानला त्याच्या जयंतीच्या दिवशी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून दिलेली ही श्रद्धांजली समजायची का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बेंगळुरू : कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री तन्वीर सेठ १० नोव्हेंबरला टिपू सुलतान जयंतीच्या रायचूर येथील कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या भ्रमणभाष संचावर अश्‍लील (पॉर्न) चित्रपट पहात असल्याचे समोर आले आहे. काही प्रसारमाध्यमांनी सेठ अश्‍लील छायाचित्रे पहात असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केले आहे. भाजपचे नेते के.एस्. ईश्‍वराप्पा यांनी सेठ यांच्या मंत्रीपदाच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. त्यांना आता या पदावर रहाण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असे ईश्‍वरप्पा म्हणाले. कर्नाटकामधील हे दुसरे असे प्रकरण आहे. यापूर्वी भाजप सरकारच्या काळात २०१२ मध्ये भाजपचे २ मंत्री विधानसभेत अश्‍लील चित्रपट पहातांना आढळले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *