लव्ह जिहाद्यांना विरोध केल्याचा परिणाम !
हिंदूंनो, तुमच्या जिवावर उठलेल्या धर्मांधांना कायमचा धाक बसवण्यासाठी संघटित व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वडगावशेरी (जिल्हा पुणे) : हिंदूंच्या मालकीच्या रिक्शात बसून मुलींशी चाळे करणार्या धर्मांधांना जाब विचारणार्या हिंदुत्वनिष्ठ रिक्शामालकाला धर्मांधांनी सळया आणि विटा यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मारहाण करण्याची घटना घडली. ९ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजता घडलेल्या या घटनेमध्ये श्री. संदीप सदामत यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्या धर्मांधांच्या टोळक्याने श्री. सदामत यांच्या घरावरही दगडफेक केली. या दगडफेकीमुळे श्री. सदामत यांच्या घराच्या काचा तुटल्या असून कुंड्या, तसेच देवघर यांचीही मोडतोड झाली आहे. नूरजहाँ आणि तिचे कुटुंबीय मारहाण करण्यात आघाडीवर होते, असे श्री. सदामत यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
१. सोमनाथनगर येथील धनलक्ष्मी हिंद नुरे या इमारतीमध्ये रहाणारे श्री. सदामत हे हिंदुत्ववादी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान या संघटनेचे कार्यकर्ते असल्याने इमारतीत रहाणार्या धर्मांधांचा श्री. सदामत यांच्यावर राग होता.
२. श्री. सदामत हे ज्या ठिकाणी त्यांची रिक्शा लावतात, त्या ठिकाणी काही धर्मांध गाडीमध्ये मुलींसोबत बसून चाळे करत असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून त्यांना कळले होते.
३. ९ नोव्हेंबरच्या रात्री धर्मांधांना खडसावण्यासाठी श्री. सदामत हे त्या ठिकाणी गेले असता १५ ते २० जणांच्या धर्मांधांच्या टोळक्याने श्री. सदामत यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. श्री. सदामत यांच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार करण्यात आले, मारहाणीमुळेे त्यांची छाती आणि पाय यांनाही दुखापत झाली. त्यांना सोमनाथनगर येथील सह्याद्री रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे.
४. या प्रसंगी श्री. सदामत यांच्या कुटुंबियांनी १०० क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
जन्महिंदूंची बघ्याची भूमिका !
धर्मांधांकडून विनाकारण हिंदु कुटुंबियाला लक्ष्य केले जात असतांना इमारतीतील अन्य जन्महिंदूंनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. (मला काय त्याचे आणि मी कशाला भांडणामध्ये पडू अशी हिंदूंची अलिप्त वृत्तीच हिंदूंमध्ये संघटितपणा निर्माण होण्यात बाधा निर्माण करते. धर्मांध त्यांच्या बांधवांसाठी एकत्र येतात, तर हिंदू का येऊ शकत नाहीत ? अन्यायाचा प्रतिकार करणे आणि अन्यायग्रस्त हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे, हे कर्तव्यच आहे याची जाणीव ठेवून हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे; उद्या त्या हिंदूंवरही ही वेळ येऊ शकते, हे ते का जाणत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
धर्मांधांचा कावेबाजपणा
एवढे सगळे घडून गेल्यानंतर नूरजहाँ आणि कुटुंबीय पोलीस ठाण्यामध्ये श्री. सदामत यांच्या विरोधात सोमनाथनगर पोलीस चौकीमध्ये खोटी पोलीस तक्रार करण्यासाठी केले. या प्रसंगी धर्मांध मुसलमान मोठ्या संख्येने एकत्र येऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरच गुन्हा प्रविष्ट केला नसून दोन्ही गटांकडून कबुलीजवाब लिहून घेतला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात