हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम !
पुणे – येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला.
१. श्री. पंडित किणीकर यांचा मालकीचे गौरीशंकर टी कंपनी हे दुकान असून येथे चहाचा किरकोळ आणि घाऊक व्यापार चालतो.
२. दुकानावरील फलकावर भगवान शंकराच्या पिंडीतून चहा पडून त्याखाली ठेवलेल्या कपबशीत तो पडतांना दाखवला होता.
३. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. पराग गोखले आणि धर्माभिमानी श्री. चंद्रकांत भोईटे यांनी त्या फलकाद्वारे विडंबन कसे होते, हे श्री. किणीकर यांना दर्शवून दिले. श्री. किणीकर यांनी ते स्वीकारून तत्परतेने फलकावरील विडंबनात्मक भाग पालटला. (तत्परतेने पालट करणारे असे हिंदू हीच हिंदु धर्माची शक्ती आहेत. – संपादक) तसेच चहाच्या पिशव्यांवर असणार्या चित्रावरही रंग देऊन त्यात पालट करू, असे सांगितले.
४. या वेळी श्री. किणीकर यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली, तसेच ते दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले.