Menu Close

पिंपरी (पुणे) येथे गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना केले पोलिसांच्या स्वाधीन

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणीची अपरिहार्यता दर्शवणारी घटना !

पिंपरी (पुणे) – येथील रहाटणी भागातील कोकणे चौक येथे मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना गोरक्षकांनी १२ नोव्हेंबर या दिवशी वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले.

१. तन्वीर अहमद याकीन अली शेख, जाकीर हुसेन अब्दुल हसन आणि सिराजद्दीन अन्सारी यारमहमंद अन्सारी हे तिघे एका मालवाहू टेम्पोतून भाजीपाल्याचे क्रेट लावून गोमांस घेऊन जात होते.

२. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे श्री. शिवशंकर स्वामी यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तो टेम्पो पकडला. त्या वेळी चालकाकडे चौकशी केली असता त्याने आरंभी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र नंतर टेम्पोत मांस असल्याचे सांगितले.

३. याविषयी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना कह्यात घेतले आणि तो टेम्पो शासनाधीन केला. तेथे चौकशी केली असता त्यांनी ते गोमांस नगर येथून आणल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *