Menu Close

जळगाव येथे लावलेले चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग काढून टाकण्यास भाग पाडले !

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्माभिमानी युवकाची अभिनंदनीय कृती !

जळगाव – येथील भर बाजारपेठेत असणार्‍या राजकमल चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात इश्क जुनून या चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग लावण्यात आले होते. हिंदु जनजागृतीच्या समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री. विजय कासार यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्परतेने अश्‍लील होर्डिंग काढण्यासाठी प्रयत्न केले. याच भागात कार्तिकी एकादशीच्या निमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन श्री. कासार यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊन अश्‍लील हार्डिंग हटवण्याची मागणी केली. श्री. कासार यांनी या घटनेची माहिती दिल्यावर त्यांचे मित्र सर्वश्री रूपेश पाली आणि राजू भोई हेही प्रबोधनासाठी आले. त्यानंतर व्यवस्थापकांनी सदर आक्षेपार्ह फलक तत्परतेने हटवला.

सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. आदित्य धर्माधिकारी यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना या संदर्भात विचारले असता, नागरिकांच्या विरोधामुळे आम्ही सदर पोस्टर काढून टाकले असून पुढेही ते लावणार नसल्याचे सांगितले. धर्मशिक्षणवर्गात मिळणार्‍या धर्मशिक्षणामुळेच ही कृती करण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना श्री. विजय कासार यांनी व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *