भाजपशासित राज्यांत हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होणे हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
विदिशा (मध्यप्रदेश) – विदिशा जिल्ह्यातील बक्सरिया येथे १२ नोव्हेंबरला दुपारी अज्ञातांकडून दीपक कुशवाह या बजरंग दलाच्या नेत्याची चाकूद्वारे भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. जमावाने येथील अनेक दुकाने, घरे यांना आग लावली. तसेच दगडफेक केली. यात काही पोलीस घायाळ झाले. यामुळे पोलिसांनी येथे संचारबंदी लागू केली आहे. हिंसाचारापूर्वी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी येथे निदर्शने केली. पोलिसांनी हिंसाचाराच्या प्रकरणी १३ जणांना अटक केली आहे. जिल्हाधिकारी अनिल सुचारी यांनी सांगितले की, येथील स्थिती सध्या सामान्य आहे. विदिशा येथून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात