भारत सरकारने इस्रायलकडून हा गुण घेऊन जनतेच्या झोपेची आणि आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणावे !
जेरुसेलम – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रीमंडळाने धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आवाजाची अधिकाअधिक मर्यादा निश्चित करणार्या विधेयकाला संमती दिली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास इस्रायलमधील मशिदींच्या भोंग्यांचा आवाज एकदम न्यून होणार आहे. इस्रायल सरकार जाहीरपणे बोलतांना कायदा सगळ्यांसाठी आहे, असा दावा करत असले, तरी हा कायदा प्रामुख्याने मशिदींच्या भोग्यांचा आवाज न्यून करण्यासाठीच असल्याचे सूत्रांकडून समजते. इस्रायलमध्ये १७.५ टक्के अरबी लोक रहातात. यातील बहुतांश मुसलमान आहेत.
जगभरातील अनेक धार्मिक संस्था कमी-अधिक प्रमाणात भोंग्यांचा वापर करतात. मात्र मशिदींमध्ये भोग्यांच्या वापराचे प्रमाण सर्वांत अधिक असते. नमाज पठणाच्या वेळी मशिदींमध्ये मोठ्या आवाजात पठण केले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात