हिंदूंनो, तुमच्या वरील अन्याय दूर होण्यासाठी हा संघटित लढा व्यापक करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोलकाता : बंगालमधील हिंदु जागरण मंच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या दक्षिण बंगाल शाखेच्या वतीने, बंगाल सरकारने हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावे आणि मुसलमानांचे लांगूलचालन बंद करावे, तसेच हिंदूंवर होणारे अत्याचार रोखावे, या मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात आला होता. या निषेधमोर्च्यात सुमारे २० सहस्रांहून अधिक हिंदूंनी सहभाग घेतला, असे हिंदु जागरण मंच या संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.
या मोर्च्याचा प्रारंभ कॉलेज चौकात होऊन राणी राशमोनी मार्गावर त्याचे भव्य सभेत रूपांतर झाले. बंगालमधील जिहादी देशविरोधी कारवाया करत आहेत, जातीय दंगली भडकवून हिंदूंवर आक्रमणे करत आहेत आणि त्यांना ममता बॅनर्जी यांचे सरकार समर्थन देत आहे, अशी सर्वच वक्त्यांकडून या सभेत टीका करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच मुसलमानांनी तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार यांच्या समर्थनाने एक जाहीर सभा घेऊन त्यात केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याच्या विरोधात आंदोलन केले होते. शासनाने सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या विरुद्ध शपथपत्र प्रविष्ट केले होते, त्यालाही मुसलमानांनी विरोध केला होता. या सभेत केंद्र सरकारने समान नागरी कायद्याच्या दृष्टीने चालवलेल्या प्रयत्नांना समर्थन देण्यात आले. सभेनंतर संघटनेच्या ५ सदस्यीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात