Menu Close

निखिल वागळे यांचे महाराष्ट्र १च्या संपादकपदाचे त्यागपत्र !

सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा फटका बसल्याची चर्चा

nikhil_wagle
निखिल वागळे

मुंबई : महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे यांनी वृत्तवाहिनीच्या संपादकपदाचे त्यागपत्र दिले आहे. ही माहिती वागळे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर दिली आहे. मी सुरक्षित आहे. महाराष्ट्र १चा राजीनामा दिला आहेे. पत्रकारिता चालूच राहील, असे वागळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर झालेल्या एका चर्चासत्रात त्यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक देत कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले होते. याची देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती आणि अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. ही घटना झाल्यावर त्याच्या दुसर्‍या दिवसापासून वागळे वाहिनीवर दिसले नाहीत. ते काही दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा होती. सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांना दिलेल्या
अपमानास्पद वागणुकीचा फटका बसल्याची चर्चा

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *