Menu Close

शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप !

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप केल्यानंतरही त्यावरून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मौलाना किंवा पाद्री यांच्यावरील आरोपांवर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगतात ! संपादक, दैनिक सनातन प्रभात

rape01

लक्ष्मणपुरी : शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण दीड वर्षांपूर्वीचे आहे; मात्र आता मी गप्प बसणार नाही, असे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस काहीही बोलण्यास नकार देत आहेत. (अशा पोलिसांना वेतन देऊन पोसायचे तरी कशाला ? या ठिकाणी हिंदूंचे संत असते, तर पोलिसांनी लगेच कारवाई केली असती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ते त्यांच्या मुलीला घेऊन विशेष पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेले होते; मात्र पोलिसांनी समाधानकारक सहकार्य केले नाही. धर्मगुरूच्या विरोधात प्रकरण असल्याने पोलीस कारवाई करण्यापासून टाळाटाळ करत आहेत, असा आरोप अली यांनी केला आहे. तसेच ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. धर्मगुरु आणि पीडित मुलगी यांच्यातील भ्रमणभाषवरील संभाषणाचे मुद्रण पोलिसांना देण्यात आल्याची माहिती अली यांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *