Menu Close

तीनदा तलाक देऊन वेश्याव्यवसायात ढकललेल्या मुसलमान महिलेची हिंदु धर्मात येण्याची इच्छा !

महिलांच्या समानतेसाठी प्रसिद्धीलोलुप आंदोलन करणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटना अशा महिलांसाठी काही करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

muslim_girl

नवी देहली : उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील एका मुसलमान महिलेस तिच्या पतीने तीनदा तलाक देऊन वेश्याव्यवसायात ढकलल्याने निराश झालेल्या महिलेने हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

एका वृत्तवाहिनीस मुलाखत देतांना महिलेने सांगितले की, तिच्या पतीने तिला रागाच्या भरात तीनदा तलाक दिल्याचे मान्य केले; मात्र परत तिच्याशी संसार थाटण्याची सिद्धता दर्शवली. तसे करण्यापूर्वी इस्लामी शरियाप्रमाणे त्या महिलेला एका परपुरुषाशी विवाह करून शारीरिक संबंध जोडणे आवश्यक आहे; म्हणून या महिलेच्या पतीने तिला त्याच्या एका मित्राकडे पाठवले.

तीन मासांनंतर ती महिला जुन्या पतीकडे परत आली असता त्याने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला, उलट तिला वेश्याव्यवसायात ढकलले. त्यामुळे कंटाळलेल्या महिलेने स्थानिक ‘जय शिवसेना’ या हिंदु संघटनेशी संपर्क साधून हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा दर्शवली. जय शिवसेना या संघटनेने तिला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *