हुब्बळ्ळी (कर्नाटक) – हुब्बळ्ळी येथे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. हुब्बळ्ळी महिला महाविद्यालय आणि ज्ञानगंगा संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या कु. नागमणी आचार यांनी ‘व्यक्तीमत्त्व विकास’ आणि ‘मुलांमध्ये गुणवृद्धी’ यांविषयी मार्गदर्शन केले. १८० शिक्षकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
कु. नागमणी आचार यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सध्या प्रचलित असलेली शिक्षणपद्धत आणि गुरुकुल शिक्षणपद्धत यांविषयी माहिती दिली. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी मुलांना प्रेरित करण्याविषयी शिक्षक अन् पालक यांची भूमिका आणि धर्माचरण यांविषयी मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. बर्याच शिक्षकांनी मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता दर्शवली.
२. ज्ञानगंगा संस्कार केंद्राचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर गोकाक व्याख्यान ऐकून प्रभावित झाले आणि त्यांनी अशी व्याख्याने सर्वत्र आयोजित करण्यासाठी साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली.
३. चांगली माहिती दिल्याविषयी ज्ञानगंगा संस्कार केंद्रच्या सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात