शिवसेना आणि युवा सेना यांच्या आक्रमकतेचा परिणाम
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कृतीशील होणारी शिवसेना आणि युवा सेना यांचे अभिनंदन !
कोल्हापूर – शिवाजी पार्क येथील ‘सेव्हन्थ डे’ या ख्रिस्ती शाळेने इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात अचानक वाढ केली. (पालकांनो, ख्रिस्ती शाळेची पैसे उकळण्याची मनोवृत्ती जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यासंबंधीच्या तक्रारी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्याकडे आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार १५ नोव्हेंबर या दिवशी युवा सेनेच्या वतीने ‘सेव्हन्थ डे’ शाळेच्या समोर निदर्शने करून प्रशासनाला शुल्कवाढीविषयी खडसवण्यात आले. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांनी शुल्कवाढ रहित केली. पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकार्यांचे आभार मानले.
१. कार्यकर्त्यांनी या वेळी ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अन्यायी शुल्कवाढ रहित झालीच पाहिजे’, अशा घोषणा दिल्या.
२. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा तिसरा हप्ता रुपये ४ सहस्र ४० रुपये आणि चौथा हप्ता ४ सहस्र २३० रुपये इतका होता; मात्र सध्या शाळा प्रशासनाकडून तिसरा हप्ता ६ सहस्र ८०० रुपये आणि चौथा हप्ता ५ सहस्र १६० रुपये इतके वाढीव शुल्क पालकांकडून घेण्यात येत होते. याविषयी युवासेना शहरप्रमुख श्री. चेतन शिंदे यांनी मुख्याध्यापक गायकवाड यांना खडसवले.
३. ‘शुल्कवाढ मागे घेऊन मनमानी कारभार थांबवावा, अन्यथा युवा सेना तीव्र आंदोलन करून पालकांना न्याय मिळवून देईल’, अशी चेतावणी श्री. चेतन शिंदे यांनी दिली.
४. आंदोलनात शिव माथाडी आणि कामगार सेनेचे शहरप्रमुख सर्वश्री राज जाधव, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, अविनाश कामते, शहर सरचिटणीस अजिंक्य पाटील यांसह पालक आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात