१५ मिनिटांत ७५ कोटी हिंदूंना संपवण्याची धमकी देणार्या ओवैसी यांच्या विरोधात काहीही न बोलणार्यांची धर्मप्रेमी सनातनला मात्र चेतावणी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : सनातन ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचे पिल्लू आहे. या संस्थेला कोण पैसा पुरवते ? यांचे आर्थित स्रोत तपासावेत. सनातनवाल्यांना रान मोकळे आहे का ? ते रस्त्यावरून जाणार नाहीत का ? सनातनने धमक्या देणे बंद करावे अन्यथा लोक कायदा घेतील हातात आणि महाराष्ट्रात सनातनच्या संस्था रहाणार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सनातनला चेतावणी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधान करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची स्वाभिमान संघटनेचे नेते नीतेश राणे यांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, राज्यशासनाचा सनातनवर वचक नाही. अशा प्रकारे गोळ्या, धमक्या यांचीच भाषा केली जाणार असेल, तर आम्ही काय गप्प बसणार्यांपैकी आहोत का ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात