-
शासनाने मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे धोरण स्वीकारल्यामुळेच मराठीची गळचेपी होणार आहे.
-
मराठी भाषेला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी शासनाने सर्वच स्तरांवर प्रयत्न करून तिला चांगले दिवस दाखवावेत, ही अपेक्षा !
-
मराठी भाषेला खरी उर्जितावस्था ही हिंदु राष्ट्रातच मिळेल, हे निःसंशय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची उणीव राहू नये, या दृष्टीने राज्यात इयत्ता १ लीपासून सेमी इंग्रजी माध्यमातील शाळा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली. इयत्ता १ ली पासून गणित आणि विज्ञान हे विषय ऐच्छिक पद्धतीने इंग्रजी माध्यमातून शिकवण्याच्या संकल्पनेला शासनाने वर्ष २००४ मध्ये अनुमती दिली. प्रत्यक्षात त्याचे तपशील, नियमावली आणि निर्णय हा शासनाने १९ जून २०१३ या दिवशीपासून नवा अभ्यासक्रम आल्यानंतर जाहीर केला. (शिक्षण विभागाचा कूर्मगतीचा कारभार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) इंग्रजीतून शिक्षण हा प्रतिष्ठेचा मुद्दा झाल्यामुळे शाळा टिकवण्यासाठी त्या सेमी इंग्रजी करण्याचे लोणच राज्यभर पसरले आहे.
१. सेमी इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयांना इंग्रजी माध्यमासाठी सिद्ध केलेले पुस्तक वापरण्यात येते. (शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ! सेमी इंग्रजी शाळांसाठी अजूनपर्यंत पुस्तकेच सिद्ध न होणे, हे शिक्षण विभागासाठी लज्जास्पद आहे. या प्रकरणी उत्तरदायी असणार्यांवर शिक्षण विभाग कोणती कारवाई करणार आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. अभ्यासक्रम तोच असला, तरी भाषेच्या काठिण्य पातळीत तफावत आहे. त्या पुस्तकांच्या आधीच अनेक जिल्हा परिषदांनी शाळा सेमी इंग्रजी करण्याची सक्ती केल्याच्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. या शाळांना अनुमती देतांना या शाळांसाठी इंग्रजीतून शिकवण्यात येणार्या विषयांचा अभ्यासक्रम आणि पुस्तके स्वतंत्रपणे करण्यात यावीत, असे म्हटले होते. प्रत्यक्षात स्वतंत्र द्विभाषिक पुस्तके सिद्ध करण्यात आलीच नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. (याचा अर्थ शिक्षण विभागाचा कारभार हा फक्त आदेश देण्यापुरता राहिला असून त्याला कोणी वाली नाही, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात