Menu Close

(म्हणे) ‘महापालिका आयुक्तांना ३०० वर्षे जुना दर्गा हटवता येणार नाही !’ – राज्य वक्फ मंडळ

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे आयुक्तांना पत्र

किती हिंदू त्यांच्या प्राचीन मंदिरांविषयी असे जागरूक असतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

dargah_muslim_dharmand_maszid

कल्याण : शहराच्या पश्‍चिम भागातील काळा तलाव परिसरात हजरत निगरानी शहा बाबा दर्ग्याच्या जागेवर महापालिकेने वाहनतळ उभारण्याचा ठराव केला आहे. या संदर्भात ‘वाहनतळासाठी आयुक्तांना ३०० वर्षे जुना दर्गा हटवता येणार नाही. वक्फ मंडळाच्या कोणत्याही मालमत्तेवर अशा प्रकारची कारवाई महापालिकेस करता येणार नाही. त्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र महापालिकेने वक्फ मंडळाकडून घेणे आवश्यक आहे’, असे राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ७ नोव्हेंबरला महापालिका आयुक्त ई. रविंद्रन यांना पत्राद्वारे कळवले आहे.

शासनाला धमकी देणारे धर्मांध ! निरपराध हिंदूंवर वारंवार कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आणि सरकार या धमकीवर काय कारवाई करणार आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

(म्हणे) ‘दर्ग्यावर कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल !’ – फारुख अब्दुल गफ्फार शेख

काळी मशीद आणि दर्गा यांची जागा ही वक्फ मंडळाची आहे. दर्गा तोडण्याची कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार फारुख अब्दुल गफ्फार शेख यांनी वक्फ मंडळाकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत वक्फ मंडळाने आयुक्तांना पत्र पाठवले. शेख यांनी याविषयी पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि अल्पसंख्यांक आयोगालाही याविषयी कळवले आहे. सामाजिक कार्यकर्ते अदनान कुवारी यांनीही दर्गा हटवण्यास विरोध केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *