११ डिसेंबरला होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने… सभेला अधिकाधिक लोकांना उपस्थित करून सभा यशस्वी करण्याचा निर्धार !
कोल्हापूर : येथील ‘पद्माराजे गर्ल्स हायस्कूल’च्या मैदानावर ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांच्या बैठका होत आहेत. या बैठकांना धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सभेला भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर उपस्थित रहाणार असल्याने सभेची उत्सुकता शिगेला पोचली आहे. बैठकांमध्ये जिज्ञासू आणि धर्माभिमानी यांनी ही धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांनी सभेसाठी साहाय्य करण्याविषयी आश्वासन दिले आहे.
बच्छे सावर्डे (तालुका पन्हाळा)
येथील मारुति मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीला ४५ धर्माभिमानी उपस्थित होते. सरपंच श्री. विनायक बांदल, पोलीस पाटील सागर यादव, डॉ. सोमनाथ बच्चे, कामधेनू दूध संस्थेचे सचिव वसंत यादव यांचीही बैठकीला उपस्थिती होते. सरपंच श्री. विनायक बांदल यांनी बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी कार्यकर्त्यांना संपर्क केला. सभेला अधिकाधिक लोकांनी उपस्थित रहाण्यासाठी नियोजन करण्यामध्ये पुढाकार घेणार असल्याचेही सांगितले.
कोडोली (तालुका पन्हाळा)
येथे बैठकीला १४ धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी भाजप युवा मोर्च्याचे शहर अध्यक्ष सर्वश्री महेश जाधव, शिवसेनेचे रामभाऊ गवळी, कोडोली भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आेंकार बुरांडे, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत केकरे, कोडोलीचे भाजप शहराध्यक्ष उदय पाटील, श्री संप्रदायाचे श्री. बलराज पाटील यांची उपस्थिती लाभली.
बच्छे सावर्डे आणि कोडोली येथील बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाड्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. श्री. महेश जाधव यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी दिवसभर २२ जणांना संपर्क केले, तसेच पुढील बैठकीचे नियोजनही केले.
शिये (तालुका करवीर)
येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी मार्गदर्शन केले. कुलदेवीचा आणि दत्ताचा नामजप करण्याचे सर्वांनी मान्य केले. जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव (नाना) पाटील यांनी ‘शिये गावाजवळील निगवे, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, सादळे मादळे या गावांचे दायित्व आम्ही घेत आहोत’, असे सांगितले. शिये येथे झालेल्या जिज्ञासूंच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांनी सभेत उपस्थित रहाणार्या मान्यवरांची माहिती करून दिली.
उपस्थित मान्यवर…
बैठकीमध्ये सरपंच सर्वश्री विश्वास पाटील, धर्माभिमानी निवास पाटील, शशिकांत पाटील, सतीश पाटील, बाजीराव पाटील, सचिन निकम, श्रीशिवप्रतिष्ठानचे उत्तम पाटील, शिवसेनेचे शाखाध्यक्ष विक्रम तासगावकर, भिकाजी जाधव, तानाजी माने, हनुमान विकास सेवा संस्थेचे सभापती कृष्णात पुंडलिक पाटील, उपसभापती विलास गुरव, श्री संप्रदायाचे शिवाजी पाटील आदी ४० हून अधिक क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. शिये येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर धर्मसभेची माहिती देणारा फलक लावण्याचे ठरवण्यात आले.
२. धर्माभिमानी श्री. निवास पाटील हे स्वतःच्या रिक्शातून सभेविषयी उद्घोषणा करणार आहेत.
शिरोली
येथील माळभागमधील घोडेगिरी तालीम मंडळाच्या सभागृहात जिज्ञासूंची बैठक घेण्यात आली. या बैठकीला ५५ जिज्ञासू उपस्थित होती. शिरोली येथे आणखी ३ बैठका घेण्याचे ठरवण्यात आले. समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी हिंदूंचे होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु धर्मावर होणार्या आघातांची माहिती जिज्ञासूंना दिली. या वेळी उपस्थित जिज्ञासूंना हिंदु धर्मजागृती सभेची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. या बैठकीला श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री अण्णा सावंत, शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश यादव, माजी उपसरपंच राजेश पाटील, शाहू दूध संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप कौदांडे, धर्माभिमानी सतीश पाटील, भाजप युवा अध्यक्ष संदीप पोर्लेकर, बजरंग दलाचे प्रशांत कागले, शाहू दूध संस्थेचे संचालक विजय वठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्षणचित्र – बजरंग दलाचे श्री. प्रशांत कागले यांनी २० नोव्हेंबर या दिवशी आणि शाहू दूध संस्थेचे संचालक श्री. विजय वठारे यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी महिलांसाठी बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. तसेच २८ नोव्हेंबर या दिवशी शिरोली येथे होणार्या एका कार्यक्रमात धर्मसभेच्या विषयाची माहिती देण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात