Menu Close

मलेशियातील हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड केल्याची ६ वी घटना !

हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता ! हिंदूंवर भारतातच नव्हे, तर आता जगभरही आघात होत आहेत. बहुसंख्य हिंदूंचे भारत सरकार त्याविषयी काही करत नाही; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! संपादक, दैनिक सनातन प्रभात

hindu_aaghat

जॉर्ज टाउन : मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या जून मासापासून राज्यात मंदिरावर होणार्‍या आक्रमणाची ही ६ वी घटना आहे.

हे मंदिर १८० वर्षे प्राचीन असून तेथील ३ मूर्तींची विटंबना झाली आहे. भगवान मुनिश्‍वरम् मूर्तीचा हात तोडला आहे, कालीमातेच्या हातातील तलवार गायब आहे, तर श्री गणेशाची मूर्ती जागेवरून हलवून तोडण्यात आली आहे.

मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष मायकेल अंथोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार सायंकाळी घडला. या मंदिराला द्वारे नसून ते खुल्या मैदानात बांधले आहे. कोमतार येथील आमदार तेह लाई हेंग यांनी पोलिसांना आरोपींचा त्वरित शोध लावण्यास सांगितले आहे. तसेच मंदिरातील मूर्ती नव्याने स्थापन करण्यासाठी ३० सहस्र रुपये दान केले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *